गणेशोत्सवाच्या आधीच ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू, आज सोनं झालं स्वस्त, वाचा 24 कॅरेटचा भाव
Gold Rate Today: गणेशोत्सवाच्या आधीच सोनं स्वस्त झालं आहे. वाचा काय आहेत आजचे सोन्याचे दर
Gold Rate Today: सोनं-चांदीच्या दरात आज शुक्रवारी पुन्हा एकदा घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तुम्ही देखील सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करताय तर ही संधी तुमच्यासाठी योग्य आहे. वायदे बाजाराबरोबरच सराफा बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. वायदे बाजारात आज सकाळी सोनं 316 रुपयांनी घसरलं आहे. तर, सराफा बाजारात आज सोनं 316 रुपयांनी घसरलं आहे. आज 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 73,150 रुपये इतके आहे. तर चांदीच्या दरात 87,200 रुपये प्रति किलोग्रामवर स्थिरावली आहे.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या किंमतीत घसरण होण्याचे कारण म्हणजे स्थानिक बाजारात दागिने विक्रेत्यांची मागणी मंदावली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसत आहे. सध्या भारतात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतेय. बाप्पाच्या आगमनाबरोबरच बाजारातही मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. सराफा बाजारातही दागिन्यांची मागणी वाढते. त्यामुळं गणेशोत्सवाच्या आधीच सोन्याचे भाव कमी झाल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे.
गुडरिटर्ननुसार, आज 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 100 रुपयांची घसरण झाली आहे. त्यानुसार प्रतितोळा 73,150 रुपयांवर दर स्थिरावले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दर 100 रुपयांनी घसरले असून प्रतितोळा 67,050 रुपयांवर दर स्थिरावले आहेत.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 67,050 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 73,150 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 54,860 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6, 705 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 315 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 486 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 53, 640 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 58, 520 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 43,888 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 67,050 रुपये
24 कॅरेट- 73,150 रुपये
18 कॅरेट- 54,860 रुपये