सणासुदीला सोनं झालं स्वस्त , 3 दिवसांत 1100 रुपयांची घट; 18,22,24 कॅरेटचा भाव जाणून घ्या
Gold Price Today: सोन्याच्या दरात आज सलग तिसऱ्यांदा घट झाली आहे. किता कमी झालं सोनं जाणून घेऊया.
Gold Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घट झाली आहे. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सणासुदीच्या दिवसांत सोन्याचे भाव कोसळल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सराफा बाजारात गेल्या तीन दिवसांत सोनं 1100 रुपयांनी स्वस्त झाले आहे. वायदे बाजारात आज सोनं 76 हजारांवर पोहोचले आहे. तर, चांदी 90,000 वर ट्रेड करत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरला बळकटी आल्यानंतर सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या दरात नरमाई दिसून येत आहे. कॉमेक्स स्पॉट गोल्ड 0.5 टक्क्याने घसरून 2607 डॉलरवर स्थिरावला आहे. तर, युएस गोल्ड फ्युचर्स 0.3 टक्क्यांने घट होऊन 2,626 डॉलरवर स्थिरावला आहे. तर, आज 24 कॅरेट सोनं 50 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर प्रतितोळा 76,640 रुपयांवर स्थिरावलं आहे.
आज सोन्याच्या दराक किंचितशी घसरण झाली आहे. आज गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट प्रतितोळा सोनं 76,640 रुपयांवर स्थिरावलं आहे. 22 कॅरेट सोनं 50 रुपयांनी घसरलं असून प्रतितोळा 70,250 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 18 कॅरेट सोनं 40 रुपयांनी घसरून 57,250 प्रतितोळा इतकं आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 70,250 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 76,640 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 57,480 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,025 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 664 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 748 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 56,200 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 61,312 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 57,480 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 70,250 रुपये
24 कॅरेट- 76,640 रुपये
18 कॅरेट- 57,480 रुपये