आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 24 कॅरेट सोन्याचे दर
Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
Gold Price Today: कमोडिटी बाजारात 18 नोव्हेंबरमध्ये सोमवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर घसरले होते. त्यानंतर आज मात्र पुन्हा एकदा सोन्याचे दर तेजीत आले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सेंज (MCX)वर सोनं सकाळी 694 रुपयांनी वधारलं होतं. तर चांदीदेखील 943 रुपयांवी वधारली होती. आज चांदी 89,364 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. चांदी 1.07 टक्क्यांवर नोंदवली आहे. मागील सत्रात 88,421 वर स्थिरावली होती.
सराफा बाजारात लग्नसराईच्या मोसमात सोनं स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत होती. आतंरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याने राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती. मात्र, मागील सत्रात पुन्हा एकदा सोनं महागलं आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळं सोनं 76,310 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 22 कॅरेट सोनं 600 रुपयांनी वधारलं असून आज प्रतितोळा सोनं 69,950 रुपयांवर स्थिरावलं आहे. आज 18 कॅरेट सोनं 490 रुपयांनी महागलं असून सोनं प्रतितोळा 57,230 रुपयांवर स्थिरावलं आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 69, 950 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 76,310 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 57,230 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6,995 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 631 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 723 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 55,960 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 61,048 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 57,230 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 69, 950 रुपये
24 कॅरेट- 76,310 रुपये
18 कॅरेट- 57,230 रुपये