Gold Price Today 26th June: आज बुधवारीदेखील सोन्याच्या दरात घट झाल्याचे समोर आले आहे. सोनं-चांदीच्या दरात आज सकाळीदेखील घसरण झाल्याचे चिन्हे आहेत. सोनं 71,400 रुपयांवर स्थिर झाले होते तर, चांदी उच्चांकी दरवाढीनंतर 10,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 230 रुपयांनी घसरले आहे. वायदे बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचे दर 72,000 रुपये इतके आहेत. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्या दरांबरोबरच चांदीच्या दरातही घट होत आहे. मौल्यवान धातु  86,937च्या तुलनेत 87,032 रुपयांवर व्यवहार करत होते. मात्र, सकाळी 10 वाजण्याच्या आसपास यात 121 रुपयांची घट झाल्याचे पाहायला मिळाले. आता चांदी 86,770 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीत बाजारातदेखील सोन्याच्या दरात सुस्ती पाहायला मिळाली. डॉलरच्या दरात तेजी आणि बॉन्ड यील्डमध्ये स्थिरता आल्यानंतर सोन्याचे दर थोडे घसरले होते. स्पॉट गोल्ड 0.4 टक्क्यांनी घसरून 2,323 डॉलर प्रति औंसवर नोंद झाली आहे. यूएस गोल्ड फ्युचर 0.4 टक्क्यांनी घटून 2,335 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. डॉलर 0.2 टक्क्यांनी वाढला होता. त्यामुळं सोनं इतर चलनाच्या तुलनेत स्वस्त झाले होते. 


ग्रॅम              सोनं           किंमत


10 ग्रॅम     22 कॅरेट   66, 000 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   72, 000 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   54, 000 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत


1 ग्रॅम     22 कॅरेट   6,600 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,200 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,400  रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत


8 ग्रॅम     22 कॅरेट   52, 800 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   57, 600  रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    43,200  रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट-  66, 000  रुपये
24 कॅरेट-  72, 000 रुपये
18 कॅरेट-  54, 000 रुपये