Gold Price Today 26 August: ऑगस्ट रोजी देशभरात भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस साजरा केला जात आहे. देशभरात जन्माष्टमी साजरी केली जात आहे. या शुभमुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. वायदे बाजार व सराफा बाजारात दोन्हीकडे सोनं स्वस्त झालं आहे. वायदे बाजारात सोमवारी 26 ऑगस्ट रोजी मौल्यवान धातुमध्ये नरमाई दिसून येत आहे.  सोनं चढ-उतारानंतर 71,761 रुपये 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. मागील सत्रात सोनं 71,777 रुपयांवर स्थिरावले होते. तर, चांदीमध्ये  341 रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदी 84,870 रुपयांवर ट्रेड करत आहे. शुक्रवारी चांदी 85,211 वर स्थिरावली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात 350 रुपयांची घसरण झाली आहे. तर, मागील व्यवहारात 99.9 टक्के शुद्धतेचे सोनं 74,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होते. तर, शुक्रवारी चांदीची किंमत 200 रुपयांनी घसरून 87,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहारवर स्थिरावली आहे. सध्या श्रावण सुरू आहे. या दिवसांत अनेक सण असतात. त्यामुळं दागिन्यांची मागणी वाढली आहे. 


सोन्याचे भाव का गडगडले?


तज्ज्ञांनी शुक्रवारी सोन्याच्या दरात घट झाल्याचे कारण सांगितलं आहे की, अमेरिकेच्या बॉन्ड यील्डमध्ये झालेली वृद्धी आणि डॉलर इंडेक्समध्ये सुधारणा. तसंच, गुरुवारी जाहीर झालेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीतील तपशिलांचाही मौल्यवान धातूंच्या किमतींवर परिणाम झाला. सट्टेबाजांनी व्याजदर कपातीच्या शक्यतेचा अतिरेक केला होता. आता त्यांनी त्यांचा दाव कमी केला आहे आणि या वर्षी फेडरल रिझर्व्हच्या उर्वरित तीन पॉलिसी मीटिंगमध्ये 0.25 टक्क्यांच्या तीन कपातीचा अंदाज व्यक्त केला आहे, तर दोन दिवसांपूर्वी दोन कपातीचा अंदाज लावला होता.


मुंबईत सोन्याचे दर


आज मुंबईत 73,067 प्रतितोळा 24 कॅरेटचा दर आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर गेल्या एका आठवड्यात 1.02% ने बदलला आहे, तर गेल्या महिन्यात -3.77% ने बदलला आहे.