मुंबई : भारतीयांमध्ये सोन्याची प्रचंड क्रेझ आहे. भारतीयांच्या अनेक सण समारंभांमध्ये सोन्याला चांगले महत्व आहे. त्यामुळे सध्या सोन्याचे दर काय ? याबाबत अनेकांना उत्सुकता असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक लोक सोन्यात गुंतवणूक देखील करतात. सोन्याचे दर कमी झाले की त्यात गुंतवणूक करून दर वाढल्यावर चांगला परतावा मिळवतात. गेल्यावर्षी सोन्याचे दर 55 हजार रुपये प्रति तोळा इतके झाल्यानंतर अनेकांनी त्यातून चांगले रिटर्न्स मिळवले होते. 


आज मल्टीकमोडिटी एक्स्चेंजमध्ये सोन्याच्या दरात फारसा बदल झालेला नसला तरी स्थानिक बाजारात सोन्याचे घसरलेले दर कायम असल्याचे दिसून आले आहे. MCX मध्ये आज सोन्याचा दर दुपारी 3 वाजता 47000 रुपये प्रतितोळेच्या आसपास ट्रेड करीत होता. 


मुंबईत सोन्याच्या दरांमध्ये 19 जून रोजी मोठी घसरण झाली होती. तब्बल 1100 रुपये प्रतितोळे सोने 19 जून रोजी घसरले होते. त्यानंतर सोन्याच्या दरांमध्ये फारशी वाढ झालेली नाही. उलट किरकोळ घसरणच पहायला मिळाली आहे. 


मुंबईतील आजच्या सोन्याचे दर
22 कॅरेट 46,150 रुपये प्रतितोळे
24 कॅरेट 47,150 रुपये प्रतितोळे


सोन्याच्या घसरलेल्या दरांचा गुंतवणूकदारांना नक्कीच फायदा होऊ शकतो. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये 55 हजारांवर गेलेले सोने यावर्षीही 60 हजारी टप्पा गाठणार असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 


------------------------------------------------------


(सोन्याच्या संबधी दिलेले दर हे कोणतेही कर न लावता आहेत. स्थानिक बाजारपेठांमध्ये हे दर बदलू शकतात)