सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घट, दागिने विकत घेण्याची योग्य वेळ
आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोरी आणि देशभरातली मागणी घटल्यामुळे सोन्याच्या किंमती पडल्या आहेत.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोरी आणि देशभरातली मागणी घटल्यामुळे सोन्याच्या किंमती पडल्या आहेत. दिल्लीच्या बाजारामध्ये सोन्याचे भाव १४५ रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदी ४१ हजार रुपये प्रति किलोवर कायम आहे. सोन्याचे भाव ३१,५७० रुपये प्रति तोळा आहे. आंतरराष्ट्रीय बाजार आणि मागणी कमी झाल्याबरोबरच डॉलर मजबूत झाल्याचा फायदाही सोन्याचे भाव कमी होण्यात झाला आहे. दिल्लीमध्ये ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचे भाव ३१,५७० रुपये आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचे भाव ३१,४२० रुपये प्रति तोळा आहेत. ८ ग्रॅमच्या बिस्कीटांचे भाव २४,८०० रुपयांवर कायम आहेत.