हृदयाचा थरकाप उडवणारे टॉप 8 अमेरिकन भयपट एकदा तरी पहाच....

कॉमेडी प्रमाणेच सस्पेन्स, थ्रील आणि हॉरर असे सिनेमे पाहणारा प्रेक्षकवर्ग देखील तितकाच मोठा आहे. त्यामुळे जर तुम्हाला ही रहस्यमय सिनेमे पाहायला आवडत असतील तर हे सिनेने नक्की पाहा.

Jul 05, 2024, 15:33 PM IST
1/8

The Exorcist 1973

अमेरिकेत 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला 'ऑस्कर'मध्ये नामांकन मिळालं होतं. एका मुलीच्या शरीरात प्रवेश केलेल्या आत्म्याला बाहेर काढण्यासाठी तिची आई धर्मगुरुची मदत घेते. या सगळ्यावर आधारीत हा भयपट चित्तथरारक आहे. हा सिनेमा प्राईमवर हा पाहता येईल. 

2/8

Hereditary 2018

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या या अमिकन सिनेमाने बॉक्सऑफिसवर $82.8 मिलियन कमाई केली. 'एरी एस्टरने' या सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. 'प्राईम'वर या हॉरर सिनेमा पाहता येईल. 

3/8

The Conjuring, 2013

'पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटी'बद्दल अनेकांना गुढ आकर्षण असतं.सत्य घटनेवर आधारित हा भयपट हृदयाचा ठोका चुकवतो. हा हॉरर सिनेमा तुम्ही 'प्राईम' आणि 'नेटफ्लिक्स'वर पाहू शकता. 

4/8

The Shining 1980

'स्टीफन किंग' या अमेरिकन लेखकाच्या कादंबरीवर आधारित या सिनेमातील चित्तथरारक प्रसंगांमुळे थरकाप उडतो. हा 'सायकोथ्रिलर' सिनेमा तुम्ही प्राईमवर पाहू शकता.   

5/8

The Ring 2022

या सिनेमातील थरकाप उडवणारे अ‍ॅनिमेटेड प्रसंग अत्यंत भितीदायक वाटतात. 2022 मध्ये या भयपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. हा सिमेमा तुम्हाला 'जिओ सिनेमा' आणि 'प्राईमवर' पाहता येईल. 

6/8

IT, 2017

सिनेमातील विदुषकाचं रहस्य जसं हळूहळू उलगडत जातं तसं तसं हा भयपट तुम्हाला खिळवून ठेवतो. त्यामुळे तुम्हाला जर भयपट पाहण्यास आवडत असेल तर हा सिनेमा तुम्ही 'प्राईम'वर पाहू शकता. 

7/8

Insidious

एका कुटुंबावर आत्म्याचं सावट असतं या कुटुंबाती छोट्या बाळाला वाचवण्याठी धडपड पाहताना अंगावर शहारे येतात. हा रहस्यमय भयपट तुम्ही 'झी 5', 'नेटफ्लिक्स' आणि 'प्राईम'वर पाहू शकता.   

8/8

The Texas Chainsaw Massacre

1974 मध्ये अमेरिकेतील सर्वात भयपट सिनेमा आहे. हा रहस्यमय भयपट तुम्हाला 'नेटफ्लिक्स'वर पाहता येईल.