सोन्याच्या दरात घसरण
लग्नसराईच्या काळात तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची आहे.
नवी दिल्ली : लग्नसराईच्या काळात तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची आहे.
लग्नसराईचा काळ सोनेखरेदीचा
सोन्याच्या मागणीत घट झाल्याने दरातही कमी झाली आहे. लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सोन्याच्या दरात घसरण
दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात २५ रुपयांनी घट झाली. सोन्याच्या दरत घसरण झाल्यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ३०,५२५ रुपयांवर पोहोचला आहे.
चांदीची किंमत स्थिर
शिक्का निर्मात्यांची मागणी सामान्य राहील्याने चांदीची किंमतही ४०,५०० रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर राहीली.
बाजार सूत्रांच्या मते, परदेशातील कमी मागणी आणि सराफ बाजारातील मागणीत घट झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे.
सोन्याच्या दरात झाली होती वाढ
राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात २५-२५ रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर ३०,५२५ रुपये आणि ३०,३७५ रुपये प्रति दहा ग्रॅम राहीला. गुरुवारी म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात १५० रुपयांनी वाढ झाली होती.