मुंबई : कोरोना व्हायरस व्हॅक्सीनबाबत चांगली बातमी आली असताना सोने-चांदीच्या (Gold Silver Price) दरात देखील घसरण पाहायला मिळत आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सोनं ७ वर्षांत पहिल्यांदा निच्चांक गाठला आहे. मात्र आता या दरात बदल होताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरात वायदा बाजारात सोन्याच्या दरात बदल झालेला पाहायला मिळत आहे. याचा परिणाम घरगुती बाजारात देखील धाला आहे. मंगळवारी सराफा बाजारात सोनं ६६२ रुपये प्रति १० ग्रॅम स्वस्त झालं असून ५०,३३८ रुपये झालं आहे. 


दिल्ली सराफा बाजारात एक किलोग्रॅम चांदीच्या दरात १४३१ रुपये घसरण झाली असून ६२,२१७ रुपये प्रति किलोग्रॅम आहे. सोमवारी एक किलोग्रॅम चांदीचा दर ६३,६४८ रुपयांवर बंद झाला. HDFC सिक्युरिटीच्या ज्येष्ठ तज्ञ तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार,'भारतात सोन्याच्या दरात बदल झाल्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी वाढू शकते.'


पुढे सोनं पण होणार स्वस्त 


तज्ञांच म्हणणं आहे की, एक वेळ अशी येईल जेव्हा सोन्याच्या दरात घसरण होणार आहे. सोनं येत्या काही काळात २०१३ मधील निच्चांक गाठणार आहे. आताच्या दरात ५ ते ८ टक्के घसरण पाहायला मिळणार आहे. 


का स्वस्त झालं सोन 


सोनं स्वस्त होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेतील फाइजर कंपनीने कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सीनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. फाइजरने असा दावा केला आहे की, कोरोना व्हायरसवर सापडलेली लस ही ९०% फायदेशीर. लवकरच या लसचा USFDA याला मंजूरी देणार आहे.