1947 साली स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सोन्याचा दर होता एवढा..
पाहा किती होता दर
मुंबई : भारत हे सोन्यासाठी ओळखला जाणारा देश आहे. आज देशात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. तुम्हाला माहित आहे का? जेव्हा आपला देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा म्हणजे 1947 रोजी देशाचा सोन्याचा भाव काय होता. लोकांच सोन्यावरचं प्रेम कधीच कमी होत नाही. खासकरून महिला सोन्याकरता अतिशय संवेदनशील असतात. सोन्यातील गुंतवणूक ही देशातील सर्वात योग्य गुंतवणूक समजली जाते. जेव्हापण विश्वातील बाजारात उलथापालथ होते तेव्हा सोनं खरेदी करण्यासाठी खूप लोकांची तयारी असते.
असा वाढत गेला सोन्याचा दर
गेल्या 71 वर्षात सोन्याच्या दराज हजारोंनी वाढ झाली आहे. जेव्हा 1947 ला भारत देश स्वंतत्र झाला तेव्हा 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 88.62 रुपये इतका होता. आज दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याचा दर हा 30 हजार 630 रुपये इतका आहे. आतापर्यंत यामध्ये भरपूर वाढ झाली आहे. 1948 मध्ये सोन्याचा दर हा वाढून 95.87 रुपये इतका झाला. यानंतर 1953 मध्ये सोन्याच्या दरात पुन्हा एकदा कमी पाहायला मिळाली. 1953 मध्ये 10 ग्रॅम सोनं 73.06 रुपयांत मिळू लागलं. 1959 ला पहिल्यांदा सोन्याच्या दराने 100 रुपये गाठले. 1959 मध्ये सोन्याचा दर 102.56 रुपये झाला. पुन्हा एकदा 1964 मध्ये सोन्याचे दर पजले. यावर्षी सोन्याचा दर हा चक्क 63.25 रुपये इतका झाला.
त्यानंतर पुन्हा एकदा सोन्याने 100 रुपयांचा दर गाठण्यासाठी 3 महिने लावले. 1967 मध्ये सोन्याचा दर हा 102.50 रुपये इतका होता. 1972 मध्ये सोन्याचा भाव पहिल्यांदा 200 रुपयांवर गेला. या वर्षी 10 ग्रॅम सोन्याचा दर 202 रुपये इतका आहे. त्यानंतर अगदी 2 वर्षांतच सोन्याचा दर 1974 मध्ये 500 रुपये झाला होता. 1980 मध्ये सोन्याने हजार रुपयांचा दर पार केल होतं. 1980 मध्ये हा भाव 1330 रुपयांपर्यंत गेला. 1985 मध्ये सोन्याचा दर 2000 रुपये इतका झाला. त्यानंतर 1996 मध्ये सोनं बाजारात 5160 रुपयांत मिळत होतं. 2007 मध्ये हा भाव 10 हजार 800 रुपयांवर गेला. 2010 मध्ये सोन्याने 20 हजाराचा स्तर गाठला आणि 2011 नंतर सोनं 26 हजार 500 रुपयांवर पोहोचलं.