Gold Rate | मोठ्या घसरणीनंतर सोन्याचे दर स्थिर;तुम्ही खरेदी केले का?
व्याजदरात वाढ झाल्याने मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये घसरण नोंदवली जात आहे. अशातच एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार सोन्याचे दागिने खरेदीसाठी सध्या चांगली संधी आहे.
मुंबई : व्याजदरात वाढ झाल्याने मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये घसरण नोंदवली जात आहे. अशातच एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार सोन्याचे दागिने खरेदीसाठी सध्या चांगली संधी आहे.
Gold Price Today: जर तुम्ही सोन्याचे दागिने किंवा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खरेदीसाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. काही दिवसांच्या सतत घसरणीनंतर सोन्याचे दर गेल्या तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर चालले आहेत. मात्र, आजच्या व्यवहारात चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर बुधवारी सोन्याचे दर 50,105 रुपयांपर्यंत घसरले होते. MCX वरच, चांदीत देखील घसरण होऊन प्रति किलोचा दर 60,885 रुपये इतका झाला. बुधवारी सकाळी सराफा बाजारातही सोन्याच्या दरात घसरण दिसून आली.
आज मुंबईतील सोन्याचे दर 51970 रुपये प्रति तोळे इतके आहे. तर चांदीचे दर 62800 रुपये प्रति किलो इतके आहे.