मुंबई : भारतीय सराफा बाजारामध्ये ग्राहकांची रेलचेल वाढली आहे. सध्या लग्नसमारंभांचा काळ सुरू असल्याने सोने - चांदीचे दागिने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक अर्थव्यवस्थेतही सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळतेय. जगभरातील शेअर बाजारात मोठ्या अंकानी घसरतात तर तेवढ्याच अंकांनी उसळी देखील घेत आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूकीसाठी मोठे गुंतवणूकदाराही सोन्यामध्ये गुंतवणूक करीत आहेत.


एमसीएक्समध्ये सोन्याचे आजचे दर 50760 रुपये प्रति तोळेवर ट्रेड करीत होते तर चांदीचे दर 50,510 रुपये प्रतिकिलोवर ट्रेड करीत होते. कालच्या तुलनेने आज सोने आणि चांदी दोघांमध्ये वाढ नोंदवण्यात आली.


मुंबईतील सराफा बाजारातही सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. मुंबईत आजच्या सोन्याचा दर  50,510 रुपये प्रति तोळे इतका होता. तर चांदीचे दर 65000 रुपये प्रति किलो इतके होते. 


ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर आपल्या सर्वोच्च स्तरावर म्हणजेच 55 हजार रुपये प्रति तोळेच्या पुढे गेले होते. त्यामुळे सोन्याचे दर उच्चांकी पातळीवरून 4-5 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे.