मुंबई : Gold price today, 28 June 2022 :  गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणाऱ्या सकारात्मक संकेतांदरम्यान, सराफा बाजारात आजही सोन्याची मागणी चांगली होती. MCXवर सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदवली गेली. तर चांदीमध्ये तेजी दिसून आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर सोन्याच्या किंमतींमध्ये 250 रुपयांची वाढ होऊन 50877 रुपये प्रति किलो इतके होत होते. तर चांदी 60404 रुपये प्रति किलो इतक्या रुपयांवर ट्रेड करीत होती. 


IBJA या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईतील सोने बाजारातही काहीशी वाढ नोंदवण्यात आली. मुंबईतील शेअर बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 51039 रुपये प्रति तोळे इतकी होती. तर चांदीची किंमत 60488 रुपये प्रति किलो इतकी होती. 


सोन्याच्या किंमती सध्या उच्चांकांवरून 4-5 हजार रुपयांनी कमी आहेत. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल आहे.