Gold Price Rate Today 7th April 2023: गेल्या दोन दिवसांच्या सलग दरवाढीनंतर आज सोन्याचे भाव (Gold Price Today) घसरल्याचे दिसत आहेत. आज सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली असून आज सोन्याचा भाव हा 24 कॅरेट सोन्यासाठी 60,870 रूपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. शुद्ध सोन्याच्या भावात सध्या मोठ्या प्रमाणात घट (Gold Price in Mumbai Today) झाल्याची पाहायाला मिळाल्यामुळे सध्या ग्राहकांना सोनं खरेदीची उत्तम संधी मिळाली आहे. सोन्याचे भाव कमी झाल्यानं तुमच्या शहरातील किंमतींनुसार तुम्ही सोनं खरेदी करू शकता तेव्हा या लेखातून जाणून घ्या की, तुमच्या शहरातील सध्याचे भाव किती आहेत. (Gold Rate Today pure gold price decreses today in mumbai know the prices in your city)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे तेव्हा चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या भावांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळते आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, 31  मार्च रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे भाव हे वधारले होते. 60,000 रूपये असे दर होते. त्यानंतर 3 एप्रिलपासून हे भाव उतरताना दिसत आहेत. 3 एप्रिल रोजी सोन्याचे भाव हे 59,670 प्रतितोळा इतके होते. त्यानंतर अचानक सोन्याच्या दरात वाढ झाली आणि सोनं पुन्हा 60 हजारांच्या पार गेले. दोन दिवसांपुर्वी सोन्याचे दर हे 62 हजारांवर होते तेच आता 60 हजारांवर आले आहेत.


मागील महिन्याभरामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव हा सरासरी 59,093 रूपये प्रतितोळा इतका होता तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 54,170 रूपये प्रतितोळा इतका होता. गेल्या 20 दिवसांमध्ये 22 कॅरेट सोनं हे 55,031 रूपये इतके होते तर 24 कॅरेट सोनं हे 60,033 रूपये इतके होते. गेल्या दहा दिवसांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर हे 60,182 रूपये तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 55,168 रूपये इतके होते. 


जाणून घ्या तुमच्या शहरातील दर 


मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 55,900 रूपये इतकी आहे. तर पुण्यात 55,900 रूपये इतकी आहे. नागपूरमध्ये हा दर 55, 900 रूपये इतका आहे तर नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर हा 55,930 रूपये इतका आहे. 9 मार्चला सर्वात कमी किमंत ही 55,530 रूपये इतकी होती. तर 18 मार्चला हिच किंमत 60,320 रूपये इतकी होती. तेव्हा वाट कसली पाहताय आत्ताच सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडा.