नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यात सोन्याचा भाव ५६ हजारांवरून ५१ हजारांपर्यंत खाली आला. सध्या तो ५२ हजारांच्या आसपास आहे. शुक्रवारी मल्टी कमॉडीटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या दरातील घसरण कायम राहिली. सोन्याच्या दरांत होणारे चढ-उतार पाहता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का नाही अशा भ्रमात ग्राहक अडकले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचे दर ५० हजार ९९० रुपये आहे. तर २४ कॅरेट भाव ५१ हजार ९९० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटसाठी सोन्यासाठी  ५१ हजार ३१० रुपये मोजावे लागत असून २४ कॅरेट सोन्याचे दर  ५५ हजार ९६० रुपये आहे. अशी माहिती  goodreturs या वेबसाईट दिली आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रती औंस २००० डॉलरपार गेले आहे. अमेरिका आणि चीनच्या व्यापारी संघर्षामुळे आणखी काही काळ कमॉडिटी बाजारावर दबाव कायम राहिल असं विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.