Gold Rates Today: क्या बात! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आज कितीने घसरले सोन्याचे भाव?
Gold Price Rates Today: सोनं खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. कमोडिटी एक्सचेंजवर (Commodity Exchange) सोन्याचे भाव हे 56 हजारांवर ट्रेण्ड करताना दिसत आहेत तक चांदीचे भाव हे 65,800 रूपयांच्या आसपास ट्रेण्ड होत आहेत.
Gold Price Rates Today: सध्या लग्नाचा सिझन हा सुरू आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सोन्याचे भाव हे गगनाला (Gold Rates Price Hike) भिडले होते. त्यामुळे अनेकांना सोनं खरेदी करणंही जीवावर आलं होतं. त्यामानानं चांदीचे भाव हे समाधानकारक होते. परंतु लग्नसभारंभांना सोनं खरेदी करणं जास्त महत्त्वाचे असल्यानं चांदी खरेदीसाठी जास्त कोणी पुढे सरसावत नाही. मध्यंतरी सोन्याची किंमत (Gold Rate Today) ही खाली वर झाल्यानंतर आता सोन्याचे भावही कमी होऊ लागले आहेत असे दिसते. त्यामुळे आपल्याला आता सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. आता सोनं हे 2700 रूपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे आता तुम्हाला सोनं खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. तुम्हाला हवे तसे डिझाईन्स (Gold Designes) तुम्ही यावेळी विकत घेऊ शकता.
सोनं खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे भाव हे 56 हजारांवर ट्रेण्ड करताना दिसत आहेत तक चांदीचे भाव हे 65,800 रूपयांच्या आसपास ट्रेण्ड होत आहेत. त्यामुळे आजचे प्राईज पाहता तुम्ही आज सोनं खरेदी करू शकता.
किती रूपयांनी स्वस्त झालं सोनं?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सोन्याचे भाव हे 0.09 टक्क्यांवर घसरले आहेत. 56,120 रूपयांनी प्रति 10 ग्रॅमनी सोनं बाजारात मिळते आहे. यावेळी सराफा बाजारात 2700 नं सोनं स्वस्त झालं आहे. मागच्या सत्रात सोन्याचे भाव हे 56,471 रूपये प्रति 10 ग्रॅम असे होते. तर चांदीचे भावही घसरले आहेत. चांदीमध्ये 0.28 टक्क्यांनी उतरले आहे. सध्या चांदीचे भाव हे 65,866 रूपये प्रति किलोग्रॅमवर आहेत.
जागतिक स्तरावर काय आहेत संकेत?
ग्लोबल मार्केटच्या (Gold Rate in Global Market) दृष्टीनं विचार करायचा झाला तर युएस मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीतही खूप मोठ्या प्रमाणावर सोनं स्वस्त झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, युएस गोल्डमध्ये (US Gold) 0.42 टक्क्यांची घसरणं झाली आहे. सध्या सोन्याचे दर हे 1,842.50 डॉलर प्रति औंसनं घसरले आहेत. त्याचबरोबर चांदी हे 22.027 डॉलर प्रति औंसवर होते.
सोन्याच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते तर कधी मोठ्या प्रमाणांवर घट होते. त्यातून आता वाढत्या महागाईच्या काळात सोने आणि चांदीच्या किमतींवर लक्ष ठेवणेही फार गरजेचे असते. मध्यंतरी सोन्याचे भाव इतके कडाडले होते की त्यामुळे सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आले होते. त्यातून चांदीच्या भावांमध्येही काहीशी अशीच घसरण होत होती. आता मात्र सोन्याच्या आणि चांदीच्या भावात (Gold and Sliver Rates) समाधानकारक वाढ दिसते आहे.