सोन्याची झळाळी 70 पार पोहोचली आहे. सोन्याचे दर वाढल्यामुळे सामान्यांना मोठा फटका पडत आहे. असं असताना गुंतवणूकदारांना मात्र याचा फायदा होणार आहे. लग्नसराईचे दिवस जवळ आले आहे. अशादरम्यान सोने खरेदीकडे लोकांचा सर्वाधिक कल असतो. भारतातील सोन्याचा भाव हा डॉलर आणि रुपया याच्या विनिमयाचा दर यावर अवलंबून असतो. 1 एप्रिल 2014 ररोजी सोन्याच्या दरात वाढ झाली असून 1300 डॉलर प्रती औस इतका असतो. 1 एप्रिल रोजी हा भाव 2260 डॉलर प्रती औस इतका झाला. यामुळेच भारतात रुपयांमध्ये भाव 69000 रुपये प्रती तोळा इतका झाला. 2014 साली एका डॉलरला भारतीय 61 रुपये मोजावे लागायचे आणि दहा वर्षांनंतर त्याच एका डॉलरला 83 रुपये मोजावे लागतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या दरम्यान सोन्याचा दर कसा वाढतो हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे समजून घेणे गरजेचे आहे. सोन्याचा भाव आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रती औस अमेरिकन डॉलरमध्ये ठरतो. जगभरात सोन्याचे एकूण उत्पादन आणि मागणीवर हा दर ठरतो. भारतीय सणवार आणि लग्नसराई याचा भावाशी फारसा संबंध नसतो. 


सोन्याच्या दराने 70 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे. परदेशी बाजारातही सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. गेल्या शुक्रवारी MCX एक्सचेंजवर, 5 जून 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोने 70599 रुपयांवर बंद झाले. तर 5 ऑगस्ट रोजी डिलिव्हरीसाठी सोने 70907 रुपयांवर बंद झाले. तर 5 एप्रिल रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 70899 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात. सोन्याचे भाव 2025 पर्यंत वाढतच राहतील असे मानले जात आहे. लोक सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहत आहेत.


सोन्याचा दर 75 हजारांच्या पार जाणार


बाजारातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, येणाऱ्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होताना दिसणार आहे. सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 75000 रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. चांदीचा दर 85 हजार रुपये प्रती किलोपर्यंत पोहोचला आहे.