मोठ्या घसरणीनंतर सोन्याचे दर स्थिर; दिवाळीनंतरही सराफा बाजारात ग्राहकांची वरदळ कायम
ग्लोबल मार्केटमध्ये मिळणाऱ्या संमिश्र आणि काहीशा पॉझिटिव्ह संकेतांमुळे भारतीय बाजारांत सोने - चांदीच्या दरांमध्ये काहीशी तेजी नोंदवली गेली आहे
मुंबई : Gold/silver price today : ग्लोबल मार्केटमध्ये मिळणाऱ्या संमिश्र आणि काहीशा पॉझिटिव्ह संकेतांमुळे भारतीय बाजारांत सोने - चांदीच्या दरांमध्ये काहीशी तेजी नोंदवली गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर डिसेंबरच्या वायदे बाजारात सोन्याचे भाव 0.33 टक्के प्रति तोळे तेजीत ट्रेड करीत होते. तर चांदीच्य किंमतीत देखील 0.74 टक्के प्रति किलोची वाढ नोंदवण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने दोन महिन्याच्या उच्च स्तराच्या जवळ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याच्या दरांमध्ये तेजी दिसून आली. मुंबईत सोन्याच्या दर काहीसे स्थिर असले तरी चांदीच्या दरांत मोठी 400 रुपये प्रति किलोहून अधिक तेजी नोंदवली गेली.
आज मुंबईतील सोने - चांदीचे भाव
22 कॅरेट 46,220 प्रति तोळे
24 कॅरेट 47,220 प्रति तोळे
चांदीच्या किंमत 64,800 प्रतिकिलो
धनत्रयोदशीच्या दिवशी 15 टन सोन्याची विक्री
धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात 15 टन सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली आहे. या दिवशी साधारण 7500 कोटी रुपये सोन्याची विक्री झाली. कोरोनाचा कमी होत असलेल्या संसर्गामुळे सोन्याची मागणी वाढली आहे.
रेकॉर्ड स्तरावरून स्वस्त सोने
कोरोना संसर्गाच्या काळात ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56 हजार प्रति तोळ्याच्या वर गेले होते. आज सोने 48 हजार प्रति तोळ्याच्या आसपास ट्रेड होत आहेत. म्हणजेच सोने जवळपास रेकॉर्ड उच्चांकीपेक्षा 7000 ते 7500 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. येत्या काळात पुन्हा सोने हा उच्चांकी दर गाठण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.