Gold-Silver Rate : आता सणासुदीला सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या काळात सोने (Gold Price) खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळेच आता अनेकजण सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या (gold-silver rate) दरात प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे भाव स्थिर दिसून येत आहेत तर चांदीचे दर वाढले आहे. शनिवारीसुद्धा सोने चांदीच्या (gold-silver rate) दरात वाढ दिसून आली होती. आज 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 46,750 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,000 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 604 रुपये आहे. (gold silver price on 11 september 2022)


देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 


चेन्नई - 51,710 रुपये


दिल्ली - 51,150 रुपये


हैदराबाद - 51,000 रुपये


कोलकत्ता - 51,000 रुपये


लखनऊ - 50,150 रुपये


मुंबई - 51,000 रुपये


नागपूर - 51,030 रुपये


पूणे - 51,030 रुपये


 


वाचा : Rohit Sharma : आशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर रोहित व्हॅकेशन मूडमध्ये; पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला 


 


22 आणि 24 कॅरेटमध्ये फरक काय?


24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.


हॉलमार्क (Hallmark)


सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते