Rohit Sharma : आशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर रोहित व्हॅकेशन मूडमध्ये; पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला

आशिया कप मध्ये (Asia Cup 2022)  भारतीय संघाची कामगिरी काही चांगली राहिली नाही. सुपर-4 सामन्यात टीम इंडियाला (India vs Pakistan Asia Cup) पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर पडली आहे. 

Sep 11, 2022, 09:38 AM IST

आशिया कप मध्ये (Asia Cup 2022)  भारतीय संघाची कामगिरी काही चांगली राहिली नाही. सुपर-4 सामन्यात टीम इंडियाला (India vs Pakistan Asia Cup) पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर पडली आहे. 

दरम्यान टीम इंडियाचे अनेक खेळाडू Asia Cup 2022 मधून बाहेर पडल्यानंतर भारतात परतले आहेत. टीम इंडियाला फायनलपर्यंतचा प्रवासही करता आला नाही. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर दुबईत फिरताना दिसत आहे.

1/4

नुकतेच रोहित शर्माने त्याची पत्नी रितिका सजदेह सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये रोहित शर्मा आणि रितिका सजदेह एका रेस्टॉरंटमध्ये बसल्याचे दिसत आहे.  

2/4

रितिका सजदेहच्या रोहित शर्माची मॅनेजर देखील आहे.

3/4

आशिया कप 2022 दरम्यान, रितिका सजदेह देखील अनेक वेळा स्टेडियमध्ये मॅचदरम्यान दिसून आलीय. रितिका (Ritika Sajdeh) नेहमी रोहितसोबतच प्रवास करते.

4/4

आशिया कप 2022 मध्ये रोहित शर्मासाठी काही खास नव्हते. त्याने या स्पर्धेतील 4 डावात 33.25 च्या सरासरीने केवळ 133 धावा केल्या.