Gold- Silver Price Today : येत्या काही दिवसात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनासाठी बाजारात आणि सोने खरेदीसाठी सर्वांची लगबग सुरू आहे. सणउत्सव म्हटलं की सोने खरेदी करण्याचा कल जास्त प्रमाणात असतो. अशातच आज (18 ऑगस्ट) सोनेच्या दरामध्ये कोणताच बदल झाला नसून चांदीच्या दरामध्ये किंचत घट झाली आहे. आजही २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७,९०० प्रति १० ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदीचे दर २० पैशांनी पडले आहेत. ५७,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Good returns या वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,९०० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,२५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,९३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,२८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,९३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,२८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,९३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,२८० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५७६ रुपये आहे.


अशी तपासावी सोन्याची शुद्धता 
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले असून ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ उपलब्ध होणार आहे. 


२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.


२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.


२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.


१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.


१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते. 


कसे तपासणार दर


सोन्या-चांदीची किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त ८९५५५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल. इथे तुम्ही नवीन दर तपासू शकता.