Gold Price Hike : सोने-चांदी खरेदीचा विचार करताय? जरा थांबा, पुन्हा दरात वाढ!
Gold-Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. आज गुरुवारी बुधवारी सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. सोन्याचा भाव 61 हजारांच्या जवळ तर चांदीचा दर 76 हजारांवर पोहोचला आहे.
Gold-Silver Price on 27 April 2023 : गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price) वाढ होत आहे. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उच्च दर ऐकून तुम्हाला धक्का बसेल. फेब्रुवारी महिन्यात सोने 55 हजाप रुपयांच्या पातळीवर पोहोचले होते. पण त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याच्या तेजीबरोबच चांदीतही वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
ऐन लग्नसराईत सोने-चांदीच्या (Gold-Silver Price) दरातील वाढ पाहून सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 55,950 रुपये आणि 24 कॅरेटसाठी 61,050 रुपये आणि आज 10 ग्रॅम चांदीची किंमत 765 रुपये असणार आहे. तर आज मुंबईत 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,050 रुपये आहे. तर पुण्यात 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,050 रुपये असणार आहे.
वाचा : सावधान! नेहमीच्या वापरात असलेली 48 औषधं गुणवत्ता चाचणीत फेल
चांदीचे दर
दरम्यान, चांदी 1 ग्रॅमची किंमत 76.50 रुपये, 8 ग्रॅमची किंमत 612 रुपये,10 ग्रॅमची किंमत 765 रुपये, 100 ग्रॅमची किंमत 7,650 रुपये आणि 1 किलोची किंमत 76,700 रुपये असणार आहे. तर दिल्ली, कोलकाता, मुंबई, लखनऊ येथे 10 ग्रॅम चांदीची किंमत 765 रुपये आणि हैदराबाद, केरळ, चेन्नई, भुवनेश्वरमध्ये 802 रुपये आहे.
शहरे | 22K सोने (प्रति 10 ग्रॅम) | 24K सोने (प्रति 10 ग्रॅम) |
मुंबई, कोलकाता, हैदराबाद, पुणे | ₹56,100 | ₹61,190 |
दिल्ली, जयपूर, चंदीगड, गुरुग्राम | ₹55,950 | ₹61,040 |
चेन्नई, कोईम्बतूर, विजयवाडा | ₹55,420 | ₹61,550 |
मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.
अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.