Gold Silver Price Today in Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कोसळले असले तरी देशातील बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे दिसत आहे. भारतीय वायदे बाजारात आज सोमवारी 6 मे रोजी सोन्या-चांदीच्या दराने उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले. सोन्याच्या दरात 300 रुपयांनी वाढ झाली आहे तर 800 रुपयांनी चांदी महागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास MCX वर सोने 368 अकांनी वाढून 71.036 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होते. तर, मागील सत्रात 70,668 रुपये इतका सोन्याचा दर होता. तर, आज चांदी 1,070 अकांनी वाढून 82,113 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. युएसमध्ये स्पॉट गोल्ड 0.05 टक्क्यांने घसरुन $2,302.09 प्रति औंस इतका होता. दोन आठवड्यात 1.8 टक्क्यांची घसरण नोंद करण्यात आली आहे. फ्युचर गोल्डमध्येही घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. 


18, 24, 22 कॅरेट सोन्याचे दर


गुडरिटर्न्सनुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 71, 050 रुपये आहे. तर, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,050 इतकी आहे. 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत 54,040 रुपये इतकी आहे. 


भारतातील महत्त्वाच्या शहरात सोन्याचा आजचा दर काय?


मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,050, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,050 आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 54,040 इतकी आहे. पुण्यात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,050, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,050 आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 54,040. दिल्लीत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,100, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,110 आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 54,150 रुपये इतकी आहे.  नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,१०२ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,०२० रुपये इतका असेल. 


शुक्रवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. शुक्रवारी सोन्याच्या दरात 350 रुपयांची घट झाली होती त्यामुळं 10 ग्रॅम सोन्याचे दर 72,000 रुपये इतके होते. तर, चांदीची किंमत 83,500 रुपये प्रतिकिलोवर स्थिर होती.