Gold Silver Price Today : सोने-चांदी खरेदीचा विचार करताय ! मग जाणून घ्या आजचे दर
Gold Price Today: गेल्या काही आठवड्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचपार्श्वभूमीवर जाणून घ्या सोने चांदीचे आजचे दर...
Gold Silver Price Today : नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हीही स्वस्त सोने-चांदी (Gold Silver Rate) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण गेल्या आठवडयातच सोने महाग झाले होते. तर चांदीच्या दरात किंचित घट झाली होती. गेल्या आठवड्यात सोने 720 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 204 रुपयांनी स्वस्त झाली. मात्र आता आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीचे दर जाहीर झाले असून जाणून घ्या सोने-चांदी (Gold Silver Latest Price today) स्वस्त झाले की महाग...
दर दोन दिवसांनी नवे दर जाहीर
आठवड्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक सप्ताह सुरू होतो. अशा परिस्थितीत आज नव्या व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीची (gold silver) वाटचाल कशी होते याकडे सर्वांचे लक्ष असेल. यामध्ये इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने नवे दर जाहीर केले असून सोने सध्या 613 रुपये प्रति 10 ग्रॅमने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा स्वस्त विकले जात आहे. तर चांदी 12000 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
तर दुसरीकडे शुक्रवारी सोने प्रति 10 ग्रॅम 209 रुपयांनी स्वस्त होऊन 55587 रुपये प्रति किलोवर बंद झाले. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 346 रुपयांनी घसरून 55796 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. तर सोन्याप्रमाणे चांदीच्या किमतीत किंचित वाढ नोंदवण्यात आली. शुक्रवारी चांदी 210 रुपयांनी महागली आणि 67888 रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा दर 1693 रुपयांनी घसरून 67678 रुपये प्रति किलोवर बंद झाला.
वाचां: गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल किती रूपयांनी महागले?
सोने सध्या 613 रुपये प्रति 10 ग्रॅमने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. दुसरीकडे, चांदी 12092 रुपये प्रति किलो दराने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा स्वस्त होत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.
मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.
अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.