Gold Old Bill : महिलांसाठी आनंदाची बातमी आहे...सोनं फक्त 113 रुपयात मिळत आहेत. आता तुम्ही म्हणाल कुठे आणि कसं...कारण एकीकडे सोन्याच्या दरात दिवसेंदिवस (Gold Silver Price Today) दरवाढ होतं आहे. अशात हे कसं शक्य आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. सोन्याच्या दरांनी आपले मागील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आज म्हणजे मंगळवार, 24 जानेवारी 2023 रोजी सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. आज वायदे बाजारात सोन्याने 57 हजार रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. मग 10 ग्रॅम सोनं फक्त 113 रुपयात कसं मिळतंय आहे. तर चला आम्ही सांगतो तुम्हाला यामागील सत्य...(Gold Rate In Maharashtra)


सोन मिळतंय फक्त 113 रुपयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याची एक जुनी पावती म्हणजे बिल सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral News) होतं आहे. ज्यामध्ये 10 ग्रॅम सोनं फक्त 113 रुपयात दिसतं आहे. हे बिल 1959 सालमधील आहे, म्हणजे साधारण 64 वर्षे जुने हे बिल आहे. एवढ्या कमी किंमतीत सोनं, हे बिल पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल ना. पण एकेकाळी सोन्यांचे दर हे फार कमी होते. आज तर या किंमतीत ब्रँडेड चॉकलेटही मिळणार नाही. हे बिल महाराष्ट्रातील वामन निंबाजी अष्टेकर (Vaman Nimbaji Ashtekar from Maharashtra) नावाच्या दुकानाचं दिसतं आहे. (Maharashtra News)




कोणाचं आहे बिल?


हे बिल आहे शिवलिंग आत्माराम या व्यक्तीचं...या व्यक्तीने वामन नावाच्या दुकानांतून 909 रुपयात सोन्या चांदीचे दागिने खरेदी केले. त्यावेळचे 100 रुपये आज 50,000 रुपये आहेत हे पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत. हे जुनं बिल ट्विटरवर Sonu(Gayatri) या अकाऊंटवर शेअर करण्यात आलं आहे. त्यानंतर हे बिल सोशल मीडियावर वाऱ्यासारखं व्हायरल होतं आहे. (Gold Silver Price Today 10gm gold priced at just rs 113 old bill viral on Social media marathin news)



झवेरी बाजारात 'स्पेशल 26' 


दुसरीकडे आज मुंबईतील झवेरी बाजारात 'स्पेशल 26' (Special 26) सारखी  Raids टाकण्यात आली. त्यानंतर मुंबईत (Mumbai news) एकच खळबळ माजली. या चोरीमध्ये बोगस इडी अधिकाऱ्यांनी (Fake ED officers raids Zaveri Bazaar) 25 लाखांसह 3 किलो सोने लुटले.