नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे दर अस्थिर आहेत. अनेक लोक सोन्यामध्ये पैसे गुंतवत असतात. त्यामुळे हा काळ सोनं खरेदी करण्यासाठी योग्य आहे का असा प्रश्न आता ग्राहकांना पडला आहे. आज बाजार सुरू होताच पुन्हा सोने आणि चांदीच्या दराने उच्चांक गाठला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर  २४२ रूपयांच्या वाढी नुसार आज सोन्याचे दर ५१  हजार ५९ रूपये प्रती १० ग्रॉम आहे. तर चांदीचे दर ८५७ रूपयांच्या उच्चांकासह ६३ हजार ७४१ रूपयांवर पोहोचले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजार तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत चढ-उतार कायम राहणार आहे. तर सोन्याचे दर येत्या काळात ४८ हजार रूपये प्रती १० ग्रॉमपर्यंत उतरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. तर दिवाळीपर्यंत पुन्हा सोन्याला पुन्हा झळाळी येवू शकते. 


मोतीलाल ओसवाल यांचे सहयोगी उपाध्यक्ष अमित ससेजा यांच्या सांगण्यानुसार, ५०० ते ६०० रुपयांपर्यंत दर घसरले तर सोन्यात गुंतवणूक करता येवू शकते. तर  एन्जल ब्रोकिंग, कमोडिटीचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, दिवाळी पर्यंत सोन्याचे दर प्रती १० ग्रॉम ५३ हजार रूपयांपर्यंत जाऊ शकतात.