मुंबई: गेल्या महिन्यापासून सोन्याचे दर घसरत आहेत किंवा स्थिर होत आहेत. दुसरीकडे ऐन सणासुदीला सोन्याचे दर वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्यावर्षी सोन्याने 56 हजार रुपयांपेक्षा जास्त दर गाठला होता. तर कोव्हिड काळात अनेकजण सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे वळलेल्याचं पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ही वाढ कमीच असल्याची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सराफ बाजारात सोन्याचे दर घसरल्याने नागरिकांची सोनं-चांदी खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये आज 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत 4, 528 रुपये आहे. तर 8 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 36 हजार 224 रुपये मोजावे लागणार आहेत. 10 ग्रॅमसाठी 45280 रुपये मोजावे लागणार आहेत. कालच्या तुलनेत आज सोनं साधारण 150 रुपयांनी वाढलं आहे. 


भारतातील सराफ बाजारात 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्यासाठी 4,964 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 8 ग्रॅमचे दर 39 हजार 712 रुपये आणि 10 ग्रॅमचे दर 49 हजार 640 रुपये आहेत. सोन्याचे दर जिल्ह्यांनुसार देखील बदलतात. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना 46 हजार 280 रुपये मोजावे लागणार आहेत. दिल्लीमध्ये 49 हजार 640 रुपये सोन्याचे दर आहेत. सर्वात जास्त सोन्याचे दर दिल्लीमध्ये आहेत. तर मुंबई आणि नागपुरात सोनं 1000 रुपयांनी इतर ठिकाणांपेक्षा स्वस्त मिळत आहे. 


गेल्या काही दिवसांतील कसे आहेत सोन्याचे दर 
27 सप्टेंबर : 24 कॅरेट सोन्याचे दर- 49,640 
27 सप्टेंबर : 22 कॅरेट सोन्याचे दर- 45,500


26 सप्टेंबर : 24 कॅरेट सोन्याचे दर- 49,480 
26 सप्टेंबर : 22 कॅरेट सोन्याचे दर- 45,350  


25 सप्टेंबर : 24 कॅरेट सोन्याचे दर- 49,480
25 सप्टेंबर : 22 कॅरेट सोन्याचे दर- 45,350  


24 सप्टेंबर : 24 कॅरेट सोन्याचे दर- 49,480
24 सप्टेंबर : 22 कॅरेट सोन्याचे दर- 45,350


23 सप्टेंबर : 24 कॅरेट सोन्याचे दर- 49,900 
23 सप्टेंबर : 22 कॅरेट सोन्याचे दर- 45,750


22 सप्टेंबर : 24 कॅरेट सोन्याचे दर- 50,180
22 सप्टेंबर : 22 कॅरेट सोन्याचे दर- 46,000


21 सप्टेंबर : 24 कॅरेट सोन्याचे दर- 49,800
21 सप्टेंबर : 22 कॅरेट सोन्याचे दर- 45,650