Gold Silver Price:युक्रेन-रशिया वादाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमती वधारल्या, जाणून घ्या आजचे दर
Gold Price in Mumbai: रशियाने युक्रेनसोबत युद्ध पुकारले असून, रशिया-युक्रेन संकटाचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावरही दिसून येत आहे.
नई दिल्ली : Gold Price in Mumbai: रशियाने युक्रेनसोबत युद्ध पुकारले असून, रशिया-युक्रेन संकटाचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावरही दिसून येत आहे.
शेअर बाजारापासून ते सराफा बाजारापर्यंत स्थिती वेगाने बदलत आहे. तिसऱ्या महायुद्धाच्या भीतीने गुंतवणूकदार घाबरले आहेत. आज बाजारात सोन्या-चांदीच्या दरात जोरदार उसळी पाहायला मिळाली.
सोने वर्षातील सर्वोच्च पातळीवर
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठी आज 1.42 टक्क्यांनी मजबूत झाले. MCX वर सोन्याच्या दरांनी 51,000 आकडा पार केला.
या तेजीसह सोन्याने वर्षभरातील उच्चांक गाठला आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही वाढ दिसून येत आहे. चांदी आज 1.40 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.
राज्यातील सोन्याचे दर
मुंबई 51,110 रुपये प्रति तोळे
पुणे 51,200 रुपये प्रति तोळे
नागपूर 51,200 रुपये प्रति तोळे
जळगाव 51, 500 रुपये प्रति तोळे
सोन्याची शुद्धता कशी तपासायची
24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिले असते.
22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 लिहिले असते.