मुंबई : मंगळवारी देशभरातील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये घसरण पाहायला मिळाली. तसेच ग्लोबल मार्केटमध्ये वाढ पाहायला मिळाली. याचा परिणाम भारतीय बाजारावर झालेला दिसतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याची किंमत ४२२ रुपयांनी वाढली असून चांदीच्या दरातही १०१३ रुपयांची उसळी पाहायला मिळाली. तज्ज्ञांच्या माहितीनुसार सोन्याचा दर दिवाळी वाढणार असून ६० हजारांपर्यंत प्रति १० ग्रॅमवर पोहोचणार आहे. 


दिल्ली सराफा बाजारातील भाव 


HDFC सिक्युरिटीजचे तज्ज्ञ तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात ४२२ रुपयांनी प्रति १० ग्रॅमच्या दरात वाढ झाली आहे. आता सोन्याचा दर ५२,०१९ रुपयांवर पोहोचला आहे. या अगोदर सोन्याचा हा दर ५२,५९७ रुपये इतका होता. 



सोन्या पाठोपाठ चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. चांदीचा दर १०१३ रुपयांनी वाढला असून आता त्याचा दर ७०,७४३ रुपये इतका झाला आहे. या अगोदर चांदीचा दर हा ६९,७३० रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.