Gold Silver Price Today : आज पुन्हा एकदा देशात सोन्या आणि चांदीच्या (Gold Silver Price) दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरणीचे सत्र सुरू होते, मात्र आज म्हणजेच 15 मार्च 2023 ला  सोने - चांदीची झळाळी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. म्हणजे पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या (Gold Silver Price) किमती वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत आज जर तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायची असेल तर आधी त्याचे सुधारित दर जाणून घ्या कारण आज तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त खर्च करावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आजही 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात (आज सोन्याचा भाव) 730 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत 3,300 रुपयांची उसळी झाली आहे.


22 कॅरेट किंमत


  • 22 कॅरेट सोने 1 ग्रॅम - 5,408 रुपये

  • 22 कॅरेट सोने 8 ग्रॅम - 43,264 रुपये

  • 22 कॅरेट सोने 10 ग्रॅम - 54,080 रुपये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाचा : पेट्रोल स्वस्त झाले की महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर 


25 कॅरेटचा दर


  • 24 कॅरेट शुद्ध सोने 1 ग्रॅम - 5,678 रुपये

  • 24 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - 45,424 रुपये

  • 24 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - 56,780 रुपये


चांदीचे दर


 तर चांदीच्या दरात कालच्या तुलनेत त्यात प्रतिकिलो 3,300 रुपयांनी वाढ झाली आहे. अशा स्थितीत त्याचा बाजारभाव आज काहीसा असा असेल. यामध्ये 1 ग्रॅम चांदीचा भाव 72 रुपये आहे. तर आज 1 किलो चांदीची किंमत 72,000 रुपये आहे.


22 आणि 24 कॅरेट सोन्यामध्ये फरक


24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत. 


मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या


22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 


अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या


आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.