Today Gold Rate : ही संधी सोडू नका! सोने-चांदीच्या खरेदीवर होईल `इतकी` बचत
Gold Silve Rate Today in Marathi: भारतामध्ये आज सोन्याच्या दरांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. तुम्ही जर आज सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचे दर नक्की तपासा...
Gold Silver Price on 30 June 2023 : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या (Gold Silver Price) दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज सोन्याच्या दरात घसरण झाली असून तुम्हाला स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. म्हणजेच आज तुम्हाला दागिने खरेदी करण्यासाठी कमी पैसे खर्च करावे लागतील. दरम्यान, सोन्याचे दागिने किंवा नाणी विकत घेण्यापूर्वी सोन्याच्या शुद्धतेची काळजी घेणे आवश्यक आहे.
काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर
गेल्या दोन दिवसांपासून सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर (Gold Silver rate) मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली होती. मात्र किमतीत फारसा फरक दिसत नसून कालच्या तुलनेत आज सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज 30 जून, 2023 ला GoodReturns नुसार, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 100 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढून अनुक्रमे 53,950 आणि 58,850 रुपयांवर पोहोचला. तर एक किलो चांदी 500 रुपयांनी स्वस्त होऊन 71 हजार 400 रुपयांवर आली आहे.
वाचा: Petrol-Diesel स्वस्त होणार की महाग? 1 जुलैपासून किमतीत होणार बदल, जाणून घ्या आजचे दर
फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात सोन्या-चांदीच्या दरांनी नवे विक्रम नोंदवले, मात्र गेल्या दोन महिन्यांपासून मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ होत नसल्याने ग्राहक व खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी सोन्या-चांदीने याप्रमाणे नवे उच्चांक नोंदवलेले होते. मात्र जून महिन्यात सोन्याने 70,000 चा टप्पा ओलांडला असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र आता 62,000 प्रति 10 ग्रॅमचा टप्पा गाठल्यानंतर सोन्याच्या किमती झरझर खाली उतरल्या आहेत. तर चांदीही उच्चांकावरुन तब्बल पाच हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची घसरण सुरू असून आज, अमेरिकेत सोन्याचा भाव $8.79 ने घसरून $1,906.75 प्रति औंस आहे. तर दुसरीकडे, चांदी 0.24 डॉलरने घसरून 22.62 प्रति औंस झाली.
वाचा: 1 जुलैपासून ‘हे’ नियम बदलणार आणि खिशावर असा पडणार ताण
तुमच्या शहरातील आजचे दर तपासा
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊ शकता. तुम्हाला थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी तुम्ही IBJA च्या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.