Maharashtra Petrol Diesel Price 30 June 2023 : तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कपात करण्याची शक्यता आहे. गेल्या 13 महिन्यांपासून राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 22 मे 2022 रोजी इंधन दरात शेवटचा बदल करण्यात आला होता. तेव्हापासून मात्र इंधनाचे दर 'जैसे थे' आहे. दरम्यान पेट्रोलियम मंत्रालय दर कमी करण्याचा विचार करत असून पुढील महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel Price) मोठा दिलासा मिळू शकतो.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या (OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमती कमी करण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशावर बसला. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने इंधन दर कपातीची घोषणा केली होती. दरम्यान आज महाराष्ट्रात पेट्रोल 106.91 रुपये तर डिझेल 93.50 रुपयांनी विकले जाणार आहे.
वाचा : 1 जुलैपासून ‘हे’ नियम बदलणार आणि खिशावर असा पडणार ताण
मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर
ठाणे पेट्रोलचा दर 105.97 रुपये तर डिझेल 92.48 रुपये प्रति लिटर
अहमदनगर पेट्रोल 106.44 तर डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर
अमरावतीत पेट्रोल 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद पेट्रोल 107.40 आणि डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.06 तर डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोल 105.96 आणि डिझेल 92.48 रुपये प्रति लिटर
वाचा: केंद्रात शिंदे गटाची ताकद आणखी वाढणार; मोदींच्या मंत्रिमंडळात आता 3 मंत्रीपदे
याशिवाय पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार RSP आणि स्पेस देऊन तुमचा शहर कोड 92249992249 किंवा नंबरवर एसएमएस करा. तुम्हाला तुमचा शहर कोड माहीत नसल्यास, तुम्हाला इंडियन ऑइलच्या वेबसाइटचा पत्ता मिळेल.