नवी दिल्ली : दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता सोनं खरेदी करणं ग्राहकांना महागात पडणार आहे. दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.


सोनं महागलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात ३५० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा दर ३२,४७५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.


चांदीही महागली


एकीकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असताना चांदीच्या दरातही वाढ झाल्याचं पहायला मिळालं. चांदीच्या दरात २५० रुपयांनी वाढ झाली त्यामुळे चांदीचा दर ४१,५५० रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.


व्यापाऱ्यांच्या मते, व्यापाऱ्यांकडून होणारी मागणी वाढल्याने आणि डॉलरच्या किमतीत झालेल्या घटमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याच्या दरात ०.८६ टक्क्यांनी वाढ होत ते १,३०४.१० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तर चांदीच्या दरातही वाढ होत १६.६४ डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे.


राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात ३५० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर क्रमश: ३२,४७५ रुपये आणि ३२,३२५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.