मुंबई : Gold Buying Strategy सोन्याची गेल्या ११ महिन्यांच्या उच्चांकावरून मोठी घसरण झाली आहे. MCX वर सोन्याची आजकी किंमत 46 हजार 575 रुपये प्रति ग्रॅम ट्रेंड करीत होती. डॉलर इंडेक्समध्ये मजबूती, बॉन्ड यील्ड आणि US Fed तर्फे व्याजदर वाढवण्याबाबतचे संकेत असल्याने सोन्याच्या किंमतींवर सातत्यातने दबाव येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी सोनं 56 हजाराच्या पुढे गेले होते. त्यामानाने आता सोनं 9500 रुपये स्वस्त मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते या लेव्हलवर गुंतवणूकदारांना एन्ट्री करण्याची चांगली संधी आहे.  येत्या काही महिन्यांमध्ये सण समारंभ सुरू होतील. तेव्हा पुन्हा सोन्याच्या किंमतींमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. 


जुलै ऑगस्टमध्ये का तेजी असते?


गेल्या १० वर्षाचा सोन्याचा चार्ट पाहिला तर लक्षात येते की, जुलै आणि ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरांमध्ये तेजी येते. आतापर्यत 2011 सोडले तर प्रत्येक वर्षी या महिन्यांमध्ये सोन्याच्या दरांध्ये तेजी दिसून आली आहे.
पुढील दोन महिन्यात सोन्याचे दर MCX  वर 49 हजार ते 50 हजारापर्यंत जाऊ  शकता. पुढील सहा महिन्यात सोन्याचे दर पुन्हा 55 हजाराला टच करू  शकतील.


सोन्यात तेजी येण्याची कारणं कोणती?
शेअर मार्केटची व्हॅल्युएशन जास्त आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे काही देशांमध्ये अनिश्चितता आहे. रुपया कमकूवत होतोय. त्यामुळे सोन्याची आयात महाग होऊ  शकते. त्यासाठी सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकं सोन्याला प्राधान्य देतात. त्यामुळे सोन्यात तेजी येण्याची शक्यता आहे.