तरुणांसाठी SBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! 5 हजारांहून जास्त जागांसाठी होणार भरती
भारतीय स्टेट बँकेत (SBI) काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.
मुंबई : भारतीय स्टेट बँकेत (SBI) काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र आणि त्यासोबतच कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) 'ज्यूनिअर असोसिएट्स' (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) या पदासाठी तब्बल 5 हजार 476 जागा भरल्या जाणार आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) 'ज्यूनिअर असोसिएट्स' (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) या पदावर काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 1 ऑगस्ट 2022 ला 20 वर्ष ते 28 वर्षे असायला हवं. तसेच, त्या उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
या पदासाठी होणारी निवड प्रक्रिया दोन फेजमध्ये घेतली जाणार आहे. पहिल्या फेजमध्ये पूर्व परिक्षा, ऑबजेक्टिव्ह टेस्ट 100 गुणांची असेल ज्यामध्ये इंग्रजी भाषा, न्यूमरिकल अॅबिलिटी, रिझनिंग अॅबिलिटी असे घटक असतील. दुसऱ्या फेजमध्ये मुख्य परिक्षा असेल ज्यात जनरल फायन्शिअल अवेअरनेस, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, रिझनिंग अॅबिलिटी अँड कॉम्प्यूटर अॅप्ट्यिट्यूड हे घटक असतील.
ज्यूनिअर असोसिएट्स' (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) पदाचा सुरुवातीचा बेसिक-पे 19 हजार 900 रुपये आणि इतर भत्ते असा आहे. अंदाजे वेतन दरमहा 29 हजार रुपये इतका असेल.
या पदासाठी अर्ज करण्यासाठी https://bank.sbi/careers किंवा https://sbi.co.in./careers या वेबसाइटला भेट द्या. त्याचबरोबर, या पदासाठी अर्ज करण्याची फी 750 रुपये असून शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे.