नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय ख्यातीचा प्रसिद्ध गोल्फपटू ज्योती रंधावा याला शिकार प्रकरणात बुधवारी उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून ए २२ रायफल आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. कतर्नियाघाट अभयारण्यातील मोतिपूर विभागात शिकार केल्याचा आरोप ज्योती रंधावा याच्यावर आहे. दुधवा व्याघ्र संवर्धन विभागात रंधावा याला उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून रायफल, मोटार आणि शिकारीसाठी लागणारी साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे.  



१९९४ पासून रंधावा व्यावसायिक गोल्फपटू म्हणून कार्यरत आहे. आशिया आणि युरोप दौऱ्यामध्ये त्याने सहभाग घेतला होता. २००४ ते २००९ या कालावधीत जगातील सर्वोत्कृष्ट १०० गोल्फपटूमध्ये ज्योती रंधावा याचा समावेश होता.