नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी सरकार मोठे पावले उचलत आहे. गेल्या आठवड्यातील आकडेवारी पाहता, कोरोनाची दुसरी लाट कमी होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकार सर्व नागरिकांना लसी देण्याासाठी प्रयत्न करीत आहे. देशात पुढील काही महिन्यात आणखी 4 लसी उपलब्ध होतील असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटले आहे की, देशातील लसीकरणाचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या काही महिन्यात भारतात आणखी 4 लसी उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये बायो-ई ची लस, जायडसची डीएनएवर आधारीत लस, भारत बायोटेकची नेजल वॅक्सिन आणि जिनेवाची लस उपलब्ध असतील. त्यांनी सांगितले की, 2021 च्या शेवटापर्यंत देशात 200 कोटी लसीचे प्रोडक्शन झालेले असेल.


सर्व लसी मेड इन इंडिया 


डॉ. पालने म्हटले की, सरकारने कोविड सुरक्षा स्किमअंतर्गत जायडस कैडिला, बायो ई आणि जिनवाच्या कोरोना लसींची देशातच निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी नॅशनल लॅबच्या अंतर्गत त्यांना टेक्निकल सपोर्ट देण्यात येणार आहे. भारत बायोटेकने नाकातून दिल्या जाणाऱ्या सिंगल डोस लशीसाठी केंद्र सरकार अनुदान देत आहे. या सर्व लशी मेड इन इंडिया असणार आहेत.


स्पुतनिक वी चे देशात प्रोडक्शन सुरू होणार


भारतीय कंपन्यांनी स्पुतनिक वी या लसीच्या टेक्नोलॉजी ट्रान्सफरबाबतची प्रक्रीया पूर्ण केली आहे. नीति आयोगाचे सदस्य रशियन सरकारच्या संपर्कात आहेत. डॉ. रेड्डीज लॅबच्या सहयोगाने इतर 6 कंपन्यांनी स्पुतनिक वी चे प्रोडक्शन भारतात करण्याविषयी  प्रयत्न करण्यात येणार आहे.