बंगळुरु : श्रीहरीकोटा येथून २२ जुलैला झेपावलेले चांद्रयान-२ चे लँडर विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी प्रयत्न करणार आहे. उद्या पहाटेच्या सुमारास चांद्रयान-२ चे लँडर विक्रम सुरक्षित उतरण्यासाठी आगेकूच करेल. हा या मोहीमेतील अखेरचा आणि महत्त्वाचा टप्पा असणारे त्यामुळे सर्व जगाची नजर याक्षणाकडे असणार आहे. उद्या पहाटे १ ते २ च्या दरम्यान विक्रम आपल्या अवतरणाची प्रक्रीया सुरू करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्रम सध्या चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५ किलोमिटर अंतारवर भ्रमण करत आहे. यावेळी विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर त्यातून पज्ञान पहाटे साडेपाच ते साडेसहाच्या सुमारास हे रोव्हर वेगळे होईल. असं इस्त्रोकडून सांगण्यात आले आहे. याचं थेट प्रक्षेपण आपल्याला झी २४ तासवर पाहायला मिळणार आहे.


चांद्रयान-२ची मोहीम ही भारतासाठी अत्यंत गौरवास्पद कामगिरी ठरणार आहे. रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत हा चंद्रावर स्वत:चे यान उतरवणारा चौथा देश ठरणार आहे.