नवी दिल्ली : 7th Pay Commission: तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. 7 व्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. सरकारने 5 व्या आणि 6 व्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांनाही भेट दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 13 टक्के वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता या कर्मचाऱ्यांनाही उर्वरित केंद्रीय कर्मचाऱ्यांइतकाच महागाई भत्ता दिला जात आहे. वास्तविक, केंद्रीय कर्मचार्‍यांमध्ये असे अनेक कर्मचारी आहेत ज्यांना आतापर्यंत 7 व्या वेतन आयोगाचा लाभ मिळत नाही. अशा कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात नवीन महागाई भत्ता जमा सुरु झाला आहे.


वित्त मंत्रालयाने निर्णय घेतला


वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, '5व्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डीए 381 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे, तर 6व्या वेतन आयोगांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डीए 196 टक्क्यांवरून 203 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच 7 टक्के ने वाढ झाली आहे. या कर्मचाऱ्यांना वाढीव डीएचा लाभही जानेवारी 2022पासून लागू करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकीही दिली जात आहे.


कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतनाचा लाभ मिळत नाही 


या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत नव्हता. केंद्रीय विभाग किंवा स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगात अद्याप समाविष्ट करण्यात आलेले नाही. मात्र वित्त मंत्रालयाच्या या घोषणेनंतर 5व्या आणि 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना 7 ते 13 टक्क्यांपर्यंत एकरकमी डीएचा लाभ मिळू लागला आहे. या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही बंपर वाढ झाली आहे.