नवी दिल्ली : ऑनलाईन किंवा कार्डद्वारे व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकार सध्या नव्या युक्त्या लढवत आहे.  २ हजार रुपयांच्या आतल्या बिलांची रक्कम डिजीटल पेमेंटच्या सुविधांचा वापर करून केल्यास करात दोन टक्के सवलत देण्याचा सरकारचा विचार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिजीटल पेमेंट संदर्भात येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.  ही सवलत थेट किंवा कॅश बॅकच्या माध्यमातून देण्यावर सध्या विचार सुरू आहे.


केंद्रीय अर्थमंत्रालयाने यासंदर्भात रिझर्व्ह बँक, कॅबिनेट सचिवालय आणि आयटी मंत्रालयाशी सल्लामसलत सुरू केल्याचं वृत्त आहे. त्यामुळे यापुढे डिजीटल पेमेंट तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.