मुंबई: रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card Holders) एक आनंदाची बातमी आहे. आता रेशन विक्रेते घरोघरी रेशनचे वाटप करणार आहेत. म्हणजेच आता रेशन दुकानावर तासनतास रांगेत उभे राहून आपल्याला ताटकळत उभे राहून वाट पाहावी लागणार नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी 'Doorstep Ration Delivery'चे उद्घाटन केले. या योजनेंतर्गत शिधा विक्रेते राज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या घरी जाऊन शिधावाटप करतील. 


आता रेशन दुकानावर थांबण्याची गरज नाही!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या योजनेचे उद्घाटन करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, याचा थेट फायदा पश्चिम बंगालच्या 10 कोटी लोकांना होईल आणि त्यांना रेशन दुकानांवर तासनतास रांगेत उभे राहावे लागणार नाही. रेशनच्या वितरणासाठी डीलर्सना कमिशनही दिले जाईल.


रेशन वितरकांना कमिशन मिळेल


ममता बॅनर्जी म्हणाल्या की, सरकार रेशन वितरकांचे कमिशन 75 रुपयांवरून 150 रुपये प्रति क्विंटल करेल. म्हणजेच रेशनच्या डिलिव्हरीवर डीलर्सना प्रति क्विंटल 75 रुपये कमिशन मिळेल. कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये या योजनेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाले, 'ही 'डोअरस्टेप रेशन योजने'चा लाभ राज्यातील 10 कोटी लोकांना मिळेल. ही योजना यशस्वी करण्यासाठी मी सर्व रेशन डीलर्सना विनंती करेन. देशातील अनेक राज्ये पश्चिम बंगालच्या योजनांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.


निवडणुकीच्या वेळी दिले होते आश्वासन


या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी ही योजना जाहीर केली होती, हे लक्षात घेण्यासारखे आहे. या योजनेंतर्गत डीलर्स लाभार्थ्यांच्या घरी शिधा पोहोचवतील. एवढेच नाही तर लोकांना रेशन पुरविण्याच्या व्यवस्थेसाठी राज्यातील 21 हजार रेशन डीलर्सना वाहने खरेदी करण्यासाठी सरकार प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देणार आहे.


'खाद्य साथी: अमर रेशन मोबाईल अ‍ॅप'


या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी राज्य सरकारच्या अन्न व पुरवठा विभागासाठी 'व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट' आणि 'खाद्य साथी: अमर रेशन मोबाइल अ‍ॅप' हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशनही लॉन्च केले. या अ‍ॅपद्वारे लोकांना रेशनकार्डसाठी अर्ज करण्याबद्दल आणि त्यासंबंधित सर्व अपडेट्स मिळण्याची तपशीलवार माहिती मिळेल.