नवी दिल्ली : सध्या लग्नसराईचा काळ सुरु असून सोनं-चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात घट झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत घट झाल्याने सोन्याचे दर घसरल्याचं पहायला मिळालं. 


सोन्याच्या दरात घसरण


दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत २५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर आता प्रति १० ग्रॅम ३१,२०० रुपयांवर पोहोचला आहे.


चांदीचा दरही घसरला 


सोन्याच्या दरासोबतच चांदीच्या दरातही घट झाल्याचं पहायला मिळालं. चांदीच्या दरात ३५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे आता चांदीचा दर ४०,६५० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.


आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं १३४९.४० डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.