नवी दिल्ली : लग्नसराईचा काळ सुरु असून सोनं-चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.


सोनं-चांदीच्या दरात घट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.



सोन्याच्या दरात घसरण


सोन्याच्या दरात २२० रुपयांनी घट झाल्याने सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ३१,४५० रुपयांवर पोहोचला आहे. त्यासोबतच चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे.


चांदीचा दरही घसरला


सोन्याच्या किंमतीसोबतच चांदीच्या दरातही घट झाली आहे. चांदीच्या दरात ४०० रुपयांनी घट झाल्याने चांदीचा दर ३९,५०० रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.



एस्सपर्टच्या मते, गेल्या महिन्याभरात जगभरातील शेअर बाजारात ६-७ टक्क्यांनी घट झालीय. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सोन्यात पैसे लावण्यास सुरुवात केली आहे. सोनं महाग असतानाही लग्नसराईचा काळ असल्याने ज्वेलर्सकडून मागणीत घट झाली आहे.


राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात २२० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर क्रमश: ३१,४५० रुपये आणि ३१,३०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे.