मुंबई : भारतसह संपूर्ण जगभरात कोरोना व्हायर या महामारीचा कहर वाढत चालला आहे. जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा हा ३ कोटींवर गेला आहे. यासोबतच ३१,२३९,५८८ लोकं कोरोनामुक्त झाले आहेत.  भारतात दररोज ९० हजारहून अधिक लोकोंना कोरोनाची लागण होत आहे. मात्र भारतात आणखी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे कोरोनाची लागण सर्वाधिक भारतात होत असली तरीही कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा देखील भारतात सर्वाधिक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्ण्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. जगभरात भारत याबाबतीत अग्रेसर आहे. भारताने कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येत भारताने अव्वल स्थान मिळवले आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत ट्विटकरून माहिती दिली आहे. भारतात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा हा जगभराक सर्वाधिक आहे. 



आरोग्य मंत्रालयाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे की, भारतात कोरोनामुक्त झालेल्यांच्या आकडा हा जगभरात सर्वाधिक आहे. तब्बल ४३ लाखांहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. भारतातील कोरोनामुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येपैकी १९ टक्के संख्या ही भारतात आहे. 



कोरोनाच्या रिकवरी रेटमध्ये भारताने अमेरिकेला देखील मागे टाकलं आहे. वर्ल्डोमीटर द्वारे जाहीर केलेल्या आकड्यानुसार, भारतानंतर संयुक्त राज्य अमेरिकेचा रिकवरी रेट १८.७० टक्के आहे. यानंतर ब्राझील देशाचा समावेश आहे. ज्याचा रिकवरी रेट हा १६.९०% आहे.