मुंबई : Visakhapatnam ship : भारतीय नौदलात आता एक नवी अत्याधुनिक युद्धनौका दाखल होत आहे. 'आयएनएस विशाखापट्टणम' असे या डिस्ट्रॉयरचs नाव आहे. ( Indian Navy set to commission Visakhapatnam ship and Vela submarine)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल 164 मीटर लांब, आणि 7400 टन वजन असलेली ही भव्य आणि शक्तिशाली युद्धनौका. नौदलाच्या प्लॅन 15 ब्राव्हो या प्रोजेक्टचा ती भाग आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही युद्धनौका आहे.


शत्रूच्या जैविक, रासायनिक, आण्विक हल्ल्याला तोंड देण्याची तिची क्षमता आहे. स्टेल्थ म्हणजे शत्रूच्या रडारला चकवा देणारी ही अत्याधुनिक युद्धनौका भारतीय नौदलाची ताकद कमालीची वाढवणार आहे. 


 भारताची ही युद्धनौका कशी आहे, पाहा हा व्हिडिओ.