IRCTC कडून तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांकरता `ही` सुविधा
प्रवाशांना होणार याचा फायदा
मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजे IRCTC लवकरच नवी दिल्ली आणि मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान खासगी तेजस एक्सप्रेस सुरू करणार आहे. लखनऊ ते नवी दिल्ली दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस ही पहिली ट्रेन असणार आहे. ज्या ट्रेनमध्ये आधुनिक सुविधा असणार आहेत. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या दरम्यान शॉपिंग करता येणार आहे.
ही शॉपिंग करता येणार आहे
प्रवासादरम्यान प्रवाशांची गरज आणि मागणीनुसार IRCTC ने ऑनबोर्ड शॉपिंग करण्याची सुविधा उपलब्ध कऱण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विक्रेत ट्रेनमध्ये चढून प्रवाशांना त्यांच्या पसंतीचे सामान उपलब्ध करून देणार आहेत. यामध्ये मेकअपचे सामान, ईअरफोन, गॅजेट्स, परफ्यूम, हँडबॅग, घड्याळ, पर्स, गिफ्ट यासारखे असे अनेक प्रकार उपलब्ध असतील.
पश्चिम रेल्वेने सुरू केली ही सुविधा
नुकतीच पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल - अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. पश्चिम रेल्वेने खरेदी करण्याची सुविधा जवळपास १६ रेल्वेंमध्ये केली आहे. यामध्ये मेल आणि एक्सप्रेसचा समावेश असेल. महत्वाचं म्हणजे ही सुविधा फक्त AC ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच मिळणार आहे.
अशी करू शकतात खरेदी
प्रवासादरम्यान विक्रेता ट्रॉली घेऊन प्रवाशांपर्यंत त्यांच्या जागेवर येणार आहे. विक्रेते हे विशिष्ट पोशाखात असणार आहे ज्यांच्याकडे POS ची मशीन असणार आहे. खरेदी केल्यानंतर या मशिनद्वारे डिजिटल पेमेंट करू शकतात. यामुळे ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी ही उत्तम सुविधा आहे.