नवी दिल्ली : राज्यासह देशभरात कोरोना रुग्णसंख्या (Corona Patient) वाढत असताना दिलासादायक बातमी समोर येतेय. येत्या काळात रेमडीसीवर इंजेक्शनची (Remedisivir Injection) किंमत आणखी कमी होणार आहे. रेमडेसिवीरच्या कच्च्या मालावरील आयात शुल्क माफ केल्याने ही किंमत कमी होणार आहे. रेमडीसीवर इंजेक्शनवर 31ऑक्टोबरपर्यंत आयात शुल्क माफ करण्यात आलाय. इंजेक्शनची टंचाई रोखण्यासाठी केंद्राने अधिसूचना जाहीर केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात रेमडेसीवीरची वाढती मागणी आणि टंचाई लक्षात घेता केंद्र सरकारनं रेमडेसिवीर इंजेक्शन तसंच इंजेक्शन तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्क माफ केलंय.


यामुळे देशात रेमडेसीवीर इंजेक्शनची निर्मीती करण्यास तसंच आयात वाढवण्यास मतद मिळणार आहे. केंद्र सरकारनं तशी अधिसूचना जारी केलीये.  ३१ ऑक्टोबरपर्यंत या औषधावरीलआयातशुल्क माफ करण्यात आलंय. यामुळे रेमडीसीवर इंजेक्शनची किंमत आणखी कमी झालेली दिसेल. 



किंमतीत कपात 


देशातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतेय. यासंदर्भात केंद्राने एक मोठा निर्णय घेतला असून रेमडीसीवीर इंजेक्शनच्या किंमतीत मोठी कपात करण्याची घोषणा करण्यात आलीय. कंपन्यांनी या किंमतीत 70 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. यापूर्वी वाढती मागणी लक्षात घेता रेमेडीसीवीर औषधाचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.


रेमडीसीवीर औषध हे Gilead Sciences ने इबोला विषाणूचा उपचार म्हणून विकसित केले होते. परंतु आता त्याचा उपयोग कोरोनाच्या उपचारासाठी केला जातोय. संशोधन अहवालात असं म्हटलंय की, कोरोना विषाणूची बनवणाऱ्या एंजाइमला हे ब्लॉक करते.


केंद्रीय रसायन आणि खत मंत्री सदानंद गौडा म्हणाले की, रेमडसवीरचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पाऊले उचलत आहे. गेल्या पाच दिवसांत सहा लाख 69 हजार रेमडीसीवर वेगवेगळ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. रेमडेसीवीरचे उत्पादन 28 लाख शीशी प्रतिमहिना वाढवून 41 लाख प्रति महिना इतकी करण्यात आलीय असेही त्यांनी सांगितले.