मुंबई : देशात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. तर आज शिक्षक दिन असल्यामुळे प्रत्येक  विद्यार्थ्याला आपल्या शाळेची आणि शिक्षकांची आठवण नक्कीच  येत असेल. त्यामुळे शिक्षक दिनानिमित्त गुगलने आपल्या खास शैलीत डूडल बनवून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलच्या या खास डूडलमध्ये पट्टी, लॅपटॉप, पुस्तकं इत्यादी शाळेत लागणारी साहित्य दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिक्षकदिनाचा इतिहास
प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्तव असतो. त्यामागे इतिहास दडलेला असतो. भारताचे पहिले उप-राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr.Sarvepalli Radhakrishnan) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत देशात शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी १९५२ ते १९६२ या साला दरम्यान भारताचे  उप-राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं.


त्यानंतर १९६२ ते १९६७ या कालावधीत त्यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. त्यांचा आज म्हणजे ५ सप्टेंबर १८८८ रोजी जन्म झाला होता. ते शिक्षक होते. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांचे विद्यार्थी त्यांना भेटायला येत असत.


माझा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत देशात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.