Google Investment In India: आपण नेहमीच समाजामध्ये महिला आणि पुरुष समानताविषयी ऐकत असतो. महिला पुरुषांच्या खाद्यांला खांदा देत पुढे जात आहे. अशातच गुगलने महिलांना प्रेरित करण्यासाठी नवीन योजना आखल्या आहेत. गुगलने महिलांकरिता मोठी घोषणा केली आहे. महिलांनी ही स्टार्टअप्स (Startups) करावा यासाठी त्यांनी इंडिया डिजिटायझेशन फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यावर भर देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ज्या स्टार्टअप्स महिला करणार आहेत अशा स्टार्टअप्समध्ये Google करणार असल्याचे कपंनीने म्हंटले आहे. ज्या महिलांना स्टार्टप करताना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते त्या महिलांच्या स्टार्टपमध्ये ही Google करणार असल्याचे कपंनीने सांगितले आहे. पुढील 5 वर्षात Google 75,000 कोटींची गुंतवणूक भारतात  करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


महिलांच्या स्टार्टअप्सवर विशेष लक्ष


Google for India इव्हेंटमध्ये, कपंनीने अनेक घोषणा केल्या त्यातील सगळ्यांचे लक्ष केंद्रित करणारी घोषणा महिलांच्या स्टार्टअप्स संदर्भातील होती. त्या इव्हेंटमध्ये Google India कंट्री मॅनेजर आणि VP संजय गुप्ता म्हणाले, “आमच्या इंडिया डिजिटायझेशन फंड (IDF) यामधील एक गुंतवणुकीचा भाग म्हणून आम्ही महिलांच्या स्टार्टअप्सवर विशेष लक्ष केंद्रित करत आहोत. लवकरच पहिल्या टप्प्यातील स्टार्टअप तयार करण्याचा विचार करत आहोत. इतकंच नाही तर यामध्ये अनेक मोठ्या कपंन्यांना सामील होण्याकरिता त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. याच कार्यक्रमात कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे समर्थित अनेक प्रकल्पांची घोषणा केली आहे.  


 


भारतातील पहिले AI केंद्र स्थापन होणार


त्याच कार्यक्रमात Google India कंट्री मॅनेजर आणि VP संजय गुप्ता म्हणाले, “एआय सह मजकूर सामग्री त्वरित व्हिडिओमध्ये रूपांतरित केली जाऊ शकते. इंग्रजीतून कोणत्याही भाषेचे भाषांतर करणे अगदी शक्य आहे.  कंपनीने भारतातील 773 जिल्ह्यांतील भाषण डेटा जमा केला आहे.  तो डाटा संकलित करण्यासाठी बंगळुरू-आधारित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससोबत भागीदारी जाहीर केली आहे, ज्यामुळे त्याचे भाषा भाषांतर आणि शोध तंत्रज्ञान यांचा चांगलाच फायदा होईल. भाषा भाषांतर आणि शोध तंत्रज्ञानामध्ये सुधारणा होणार असल्याचे हे स्पष्ट झाले आहे. भारतातील पहिले AI केंद्र मद्रास येथे स्थापन करण्यात येणार असून  US$ 1 दशलक्ष अनुदान देण्याची घोषणा Google ने केली आहे.


 


डिजिटल लॅबमध्ये रूपांतर


देशात नॅशनल टेस्टिंग हाऊस अॅप लवकरच लाँच केले जाणार आहे. याची माहिती ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी दिली आहे. लवकरच सगळ्या लॅबचे डिजिटल लॅबमध्ये रूपांतर होणार असल्याचे सांगितले आहे. प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण व्हावं यासाठी नवनवीन मशीन येणार आहेत कारण आतापर्यंत हे काम मॅन्युअल होत होते. पण या प्रक्रियेमुळे येणाऱ्या काळात कमी वेळात चाचणी करता येणार.